उन्हाच्या झळा, घामाचा त्रास आणि कोरड्या त्वचेनं हैराण आहात? उन्हाळा आला की त्वचेचं बारा वाजतात! पण टेन्शन घेऊ नका , कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उन्हाळ्यातही त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्याचे ५ सोपे आणि जबरदस्त फंडे … चमकदार, टवटवीत आणि हेल्दी स्किनसाठी हे स्मार्ट ट्रिक्स फॉलो करा आणि उन्हाळ्याची मजा द्विगुणित करा! चला मग, जाणून घेऊया हे खास फंडे
भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्याचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार दिसते.
सनस्क्रीनचा वापर
घरात असाल तरीही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
कमीत कमी SPF 30 किंवा त्याहून अधिक SPF असलेला सनस्क्रीन वापरा.
बाहेर पडण्याच्या २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा आणि ३-४ तासांनी परत लावायला विसरू नका.
हलके आणि आरामदायक कपडे घाला
उन्हाळ्यात घाम आणि धुळीमुळे त्वचेवर इंफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे
कॉटन किंवा लिलेनसारखे श्वास घेणारे (breathable) कपडे घाला.
शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, जेणेकरून त्वचा थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही.
नैसर्गिक फेसपॅक आणि स्क्रबचा वापर करा
उन्हाळ्यात त्वचेतील मळ बाहेर काढण्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा स्क्रब आणि फेसपॅक लावा. दही आणि बेसन फेसपॅक लावू शकता . लिंबू आणि साखरेचा स्क्रब हे उपाय टॅनिंग कमी करतात आणि त्वचेचा रंग निखरतो.
हे उपाय करा
- योग्य आहार आणि फळभाज्यांचा समावेश करा
- त्वचेच्या आरोग्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे.
- काकडी, टोमॅटो, कलिंगड, संत्री यांसारखी पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खा.
- ऑईल आणि जंक फूड टाळा.
- आहारात व्हिटॅमिन C, ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतील याची काळजी घ्या. हे त्वचेला आतून पोषण देतात.