हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजना अंतर्गत सामान्य नागरिकांना त्यांच्या आयुष्यात प्रगती करता येते. यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत असतो. समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांना एका स्तरावर आणण्यासाठी शासन नियमित नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता सरकारने एक वेगळी योजना आणलेली आहे. सरकारच्या या योजनेचे नाव सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प योजना असे आहे. यामध्ये नागरिकांना मोडी लिपीचे शिक्षण शासनामार्फत दिले जाणार आहे.
या योजनेतील खास गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षण घेतानाच तुम्हाला 10 हजार रुपये विद्या वेतन देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता. यामुळे तुमच्या ज्ञानात देखील वाढ होईल आणि तुम्हाला आर्थिक मदत देखील होणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थांच्या वतीने मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सारथी या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला या अर्जाबाबतची सविस्तर माहिती मिळेल. तसेच तुम्हाला अर्ज देखील करता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच तो नॉन क्रिमिलियर असणे गरजेचे असते. तो उमेदवार मराठा किंवा कुणबी समाजाचा असावा. तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. जातीचे प्रमाणपत्र नसल्यास किंवा ईव्हीएस प्रमाणपत्र असावे. तसेच उमेदवाराला त्याचा जन्माचा दाखला आणि दहावीचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
महिन्याला मिळणार विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. दोन महिन्यांचा 60 ऑनलाइन तासांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. परंतु यामध्ये काही मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
या योजनेचा उद्देश काय ?
शाहू महाराजांच्या काळातील कोल्हापूर संस्थानातील पारित ठराव प्रशासकीय अहवाल यातील अनेक कागदपत्र ही मोडी लिपीत आहे. जी जास्त कोणाला कळत नाही. त्यामुळे हे अहवाल प्रकाशित करण्याचा सारथी यांचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांसाठी ही योजना असण्यात आलेली आहे. यातून त्यांना मोडी लिपीचे ज्ञान मिळेल आणि त्यांना दर महिन्याला विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या.