कापरी मध्ये मेंढ्याच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । शिराळा तालुक्यातील कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २० कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ७ कोकरे जखमी झाली आहेत. याठिकाणी असणारी ४ कोकरे बिबट्याने लंपास केले आहेत. ही घटना सायंकाळच्या सुमारास कापरी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या पाझर तलाव जवळील श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शेतात घडली. रेड येथील मेंढपाळ सुभाष तांदळे यांची मेंढरे श्रीकांत पाटील यांच्या शेतात बसविण्यात आली होती.

कोकराना त्यांनी कुंपण वजा तात्पुरता आडोसा केलेला होता. तांदळे हे त्यांच्या राखणीसाठी दिवसभर थांबले होते. सायंकाळी साडे सहा वाजल्यानंतर जेवण आणण्यासाठी ते गावाकडे गेले असता त्याचा फायदा घेत शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोकराना ठेवलेल्या कुंपणावरुन उड्डी मारत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात २० कोकरांचा जागीच मृत्यू तर ७ कोकरांना बिबट्याने जखमी केले तर चार कोकरांना बिबट्याने लंपास केले आहे.

कोकरांचा आवाज ऐकून शेताचे मालक श्रीकांत पाटील यांनी शेताकडे धाव घेतल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. मेंढपाळ सुभाष तांदळे यांनी हे विदारक चित्र पाहताच टाहो फोडला. या घटनेनं तांदळे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वन रक्षक बाबा गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here