कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील विंग कणसे मळा येथे बिबट्याने मेंढपाळाच्या कल्पनांवर तसेच घोड्यावर अचानक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला तर शिंगरू गंभीर जखमी झाले होते. त्या शिंगरुचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी कराड तालुक्यातील विंग येथील कणसे मळा या ठिकाणी जगन्नाथ महादेव होगले यांच्या गट नंबर 759 या शेत शिवारामध्ये मेंढपाळ चरत होते. या ठिकाणी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घोड्यांवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात एक घोडा ठार झाला असून शिंगरू जखमी झाले आहे. या शिवारात कोळे येथील अक्षय भिमराव शिनगारे यांच्या मेंढ्या बसवल्या होत्या.
या ठिकाणी बिबट्याने घोड्यांवर हल्ला करून घोड्याला ठार केले. कणसे मळ्यात बिबट्याची वस्ती असून या अगोदरही बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मलकापूर वनरक्षक रमेश जाधवर यांनी जागेवरती जाऊन पंचनामा केला. दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.