पुणे बंगलोर महामार्गावर सापडला मृत बिबट्या; वाहनाच्या धडकेत मृत्यू?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. वाठार ता. कराड येथे आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाठारजवळ पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर एका बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने महामार्गावरील प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. तसेच घटनेतील मृत बिबट्या हा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मृत बिबट्यावर वनविभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक माहिती अशी, आज दि.26.12.2021 रोजी सकाळी 5.30 वाजता वनक्षेत्रपाल बामणोली बाळकृष्ण हसबनिस यांना त्यांच्या सहकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग 4 वर कराड तालुक्यातील वाठार जवळ असलेल्या उड्डानपुला जवळ एक बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे असा फोन करून निरोप दिला. त्यानंतर वनक्षेत्रपाल हसबनिस यांनी तात्काळ कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना फोन करून निरोप दिला.

तात्काळ वनक्षेत्रपाल कराड व त्यांची टीम ही वाठार येथे पोहचली व पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेतील रस्त्यावर पडलेला दिसला. स्थळ पंचनामा करून शवविच्छेदन साठी कराड पशुसंवर्धन दवाखान्यात घेऊन आले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी शवविच्छेदन केले.

सदर बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला नर आहे. तसेच त्याचे वजन साधारण 45 किलो आहे. तर वय अंदाजे 4.5 ते 5 वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे. डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरात धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदन मध्ये स्पष्ट झाले.

बिबट्याचे सर्व अवयव, मिश्या, सर्व नखे, सर्व दात हे सुस्थितीत होते. अज्ञात वाहनाचा तपास सुरू आहे. सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील, आदी वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले.

Leave a Comment