म्हणुन तो बिबट्या NH4 हायवेवर बसून राहिला; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना (Video)

Leopard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाचवड फाटा (नांदलापूर) ता. कराड दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गालगत बिबट्याने काही क्षण ठोकला. एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी उडाली. बिबट्याने महामार्गावर काही क्षण विश्रांती घेतलयानंतर त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, महामार्गवर बसलेल्या बिबट्याचे काही वाहनधारकांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा ते नांदलापूर दरम्यान आज बुधवारी पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला बिबट्या बसल्याचे वाहनधारकांना दिसून आले. बिबट्याला अचानक वाहनासमोर पाहिल्यावर वाहनधारकांची काही काळ भंबेरी उडाली. बिबट्या महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना महामार्गावर असलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे व गोंगाटामुळे बिबट्या काही वेळ महामार्गावरच स्तब्ध बसून राहिला. त्यानंतर त्याला मार्ग मिळताच त्याने महामार्गावरून धूम ठोकली. दरम्यान, काही बांधवांनी महामार्गावर वसलेल्या बिबट्याचे मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक होऊन बिबट्या जखमी झाला आहे. कराड नंदलापूर फाट्याजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. बिबट्या हा रस्ता ओलांडत असताना त्याला अचानक अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्या जखमी झाला. घाबरलेला जखमी बिबट्या हाय वेवर बसून असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर दुचाकीवरील काही नागरिकही बिबट्याला पाहुन चांगलेच घाबरले होते. कराड नंदलापूर फाटा हा मोठा रहदारीचा रस्ता आहे. हा रस्ता बिबट्या ओलांडत होता. तितक्यात त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे बिबट्या जवळजवळ अर्धा तास हायवेवरच बसून होता. त्यानंतर तेथील लोकांनी फॉरेस्टला माहिती दिली. परंतु काही वेळात तो बिबट्या शेजारीच असणाऱ्या उसाच्या शेतात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अजूनही त्या बिबट्या चा शोध सुरू असून तो जखमी आहे का हे पाहण्यासाठी हा शोध सुरू आहे. अशी माहिती वनविभागाने दिली.