ठाण्यात बिबटयाचे कातडे विक्री करणारे २ ताब्यात,गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगरात बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असताना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

उल्हासनगर कॅम्प १ येथील शहाड ब्रिज जवळ दोन इसम बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उल्हासनगर गन्हे अन्वेषण विभागाने त्या ठिकाणी सापळा रचला. दोन इसम संशयित त्या ठिकाणी फिरत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये बिबटया या वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक व सुकलेले कातडे मिळून आले. ताब्यात घेतलेल्या त्या दोन इसमांची नावे संतोष हंगारगे आणि प्रकाश वाटूडे अशी आहेत. हे दोघे जालना व परभणी येथील राहणारे आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment