बिबट्याच्या मादीची आणि पिल्लाची सहा दिवस सुरु असणारी कहाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

काले, ता. कराड येथील चौगले मळामधील श्री. जयकर बाबूराव पाटील यांच्या करीच्या शिवारात ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अचानक ऊसाच्या सरीत एका बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. त्याच सरीत त्यांना बिबटयाचा जिवंत बछडा आढळून आला. तोडणी कामगारानी लागलीच जिवंत बछडा व मृत बछडा सुरक्षीत स्थळी (शेजारील घराजवळ) घेवून गेले व काले गावचे पोलिस पाटील यांना खबर दिली.

दरम्यानच्या काळात तोडणी कामगारांनी ऊसाच्या रानात मादी बिबट्या असेल म्हणून ऊसाचे रान पेटवून दिले. रान पेटल्यामूळे आत लपलेली मादी मागील बाजूने दुस-या रानात पळून जाताना लोकांनी पाहिले.पोलिस पाटिल श्री. दिपक पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तात्काळ परिक्षेत्र वनअधिकारी कराड डॉ. अजित साजणे व वनअभ्यासक रोहन भाट्टे यांना फोन करून माहिती दिली.

परिक्षेत्र वनअधिकारी कराड व रोहन भाट्टे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहचल्यावरती एक बछडा मृत आढळला व एक जिवंत होता. बछडा साधारण ३० ते ४० दिवसाचा असावा असा अंदाज होता. पशुवैद्यकीय अधिकारी बिबट्याची मादी डॉ.हिंगमिरे यांनी घटनास्थळी भेट देवून जिवंत बछडयाची सखोल तपासणी केली. बछड्याचे सर्व लक्षणे सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा बच्छडा मादी जातीचे होते व वजन २ किलो होते. मृत पिल्लाचा पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले. पिल्याचे मृत्यूचे कारण उपासमारीमूळे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या मृत पिल्लाचे सर्व अवयव सुस्थितीत होते हया मृत पिल्लास सहा. वनसंरक्षक किरण कांबळे व परिक्षेत्र वनअधिकारी कराड डॉ. अजित साजणे यांच्या समक्ष दहन करण्यात आले. जिवंत पिल्लास डॉक्टरांच्या सुचनेनुसार दर ३ तासाला २५ मिली मेंढीचे दूध पाजण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रात पिल्लू सापडणे व मादी जवळपास खात्रीशीर असणे, अशी घटना घडली, मादी ही बिथरु नये व हल्ला करू नये म्हणून कांही तज्ञ व वरीष्ठांचे सल्ला मसलत करण्यात आली. त्यानूसार सदर जिवंत पिल्लू सकाळी सापडलेल्याच ठिकाणी ठेवल्यास मादी पुनश्: घेवून जाईल अशी खात्री त्याच दिवशी सांयकाळी ६.३० जिवंत पिल्लास कॅरेट मध्ये घालून ठेवण्यात आले. कॅरेटच्या चारी दिशेला विशेष नाईट मोड कॅमेरे लावण्यात आले. मादी रात्री ९.५२ ला कॅरेटजवळ येवून निघून गेली. पुनश्: पहाटे ४.३० ला येवून गेली पण पिल्लू मात्र घेवून गेली नाही. दुस-या दिवशी सकाळी पिल्लू तिथेच असल्या कारणे पुन्हा डॉक्टरांना दाखवून डॉक्टरांच्या सल्यानूसार दूध सुरु ठेवले. माणिकडोह बिबटया पुर्नवसन केंद्र जुन्नर येथील तज्ञ डॉ. अजय देशमुख यांना घटनास्थळी येण्याची विनंती करण्यात आली. डॉ. देशमूख व त्यांचे सहकारी इंग्लंडहून खास नॅशनल जिओग्राफिकचे चित्रीकरणासाठी आलेली टीम कराडला दाखल झाली. सलग ५ दिवस मादी पिल्लूस घेवून जाईल. म्हणून जागेवर विविध प्रकारचे कॅमेरे व आपल्या पिल्लाचा वास यावा यासाठी युक्त्या लढवण्यात आल्या. ५ दिवस रोज मादी रात्री २ वेळा येवून आपला पिल्लू सुखरुप आहे. याची खातरजमा करायची पंरतु ही मादी कदाचीत प्रथमताच विहलेली होती व वनविभागाने लावलेले कॅमेरे व कॅरेट यास घाबरत होती. शेवटी ६ व्या दिवशी मादी आपल्या पिलाला सुखरुप पणे घेवून गेली.

Leave a Comment