Friday, June 2, 2023

मारुतीची ‘ही’ कार जोरदार चर्चेत; महिंद्राच्या THAR ला देणार टक्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या मार्केटमध्ये स्पोर्टी अन् दणकट SUV गाड्यांची चलती आहे. मग ती महिंद्राची न्यु जनरेशन थार असो वा फोर्स कंपनीची गुरखा असो. आता या सगळ्यांनाच फाईट द्यायला आलीय मारुतीची Jimny.

Maruti Jimny या SUV ची कार प्रेमी खूप दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. कारण अतिशय खास फिचर्ससह मारुतीने Gimny लाँच केलीय. हटके डिझाईन, दमदार पाॅवर अन् तगडे फिचर्स यामुळे जिम्नी बद्दल आकर्षण वाटनं साहजिक आहे. म्हणुनच हॅलो महाराष्ट्रच्या यंदाच्या हॅलो कार रिव्हिव्ह मध्ये आपण मारुती जिम्नी बाबात जाणुन घेणार आहोत.

जिम्नीची वेगळी ओळख बनते ती तिला देण्यात आलेल्या दमदार इंजिनमुळं. चढ असो वा उतार, फर्फ असो वा कडक उन्ह जिम्नी तुम्हाला नक्कीच त्रास होऊ देणार नाही. कारण आहे तिचं हे इंजिन.

दमदार इंजिन

इंटरनॅशनल-स्पेक जिम्नी 1.4 लीटर माइल्ड-हायब्रिड टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येते. भारतासाठी, 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन वापरले गेलेय. हेच इंजिन मारुतीच्या Vitara Brezza, Ciaz, Ertiga आणि XL6 कारमध्येही उपलब्ध आहे. हे इंजिन 6000rpm वर 103bhp मॅक्सिमम पॉवर तसेच 4400rpm वर 138Nm पीक टॉर्क निर्माण करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे आणि पर्यायी 4 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन देखील देण्यात आलं आहे.

कशी आहे मारुती जिम्नी?

जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी 3,850 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि उंची 1,730 इतकी मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस 2,550mm असेल. तर, लांबी आणि व्हीलबेस 300 मिमीने वाढेल. व्हीलबेस विटारा ब्रेझापेक्षा थोडा लांब आहे.

किंमत, फिचर्स अन् लूक यामुळे जीप कंपास महिंद्राची थार, फोर्सची गुरखा यांना गाड्यांना तगडी फाईट देणारेय हे नक्की.

आमचा कार रिव्हिव्ह तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पहात असाल तर आमचं हॅलो महाराष्ट्र पेज लाईक करा, युट्युबवर सबस्क्राईब करा. लवकरच भेटुयात नवीन गाडी अन् नवीन रिव्हिव्हसह.