हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC Housing Finance : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता LIC Housing Finance लिमिटेडने देखील ग्राहकांना मोठा धक्का देत कर्जदरात 0.35 टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या होम लोन वरील किमान दर 8.65 टक्के झाला आहे.
गेल्या आठवड्याटच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC) ने देखील आपल्या रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.35 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांचा किमान होम लोन रेट 8.65 टक्क्यांवर नेला. मे 2022 पासून HDFC ने कर्जदरात 225 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. LIC Housing Finance
LIC हाऊसिंग प्राइम लेंडिंग रेटमध्ये झाली 0.35 टक्क्यांनी वाढ
LIC Housing Finance कडून एका निवेदनात सांगण्यात आले की,”त्यांनी कर्जावरील व्याज दराशी संबंधित एलआयसी हाऊसिंग प्राइम लेंडिंग रेट (LHPLR) 0.35 टक्क्यांनी वाढवले आहेत. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी वाय विश्वनाथ गौडा यांनी सांगितले कि, “बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊनच ही दर वाढ करण्यात आली आहे.”
क्रेडिट स्कोअर चांगला हवा
हे लक्षात घ्या कि, कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा कर्ज देताना बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून क्रेडिट स्कोअरला खूप महत्त्व दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळेल. याशिवाय त्याला आपल्या आवडत्या क्रेडिट कार्डसाठीही अर्ज करता येईल. LIC Housing Finance
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.lichousing.com/
हे पण वाचा :
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
IDBI Bank च्या ‘या’ FD वर मिळेल 7.60% व्याज, जाणून घ्या अधिक तपशील
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
New Business Idea : जास्त भांडवलाची गरज नसलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये, सरकारकडूनही मिळेल मदत
Investment Tips :’या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून नवीन वर्षात मिळवा मोठा नफा