नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची उपकंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. कंपनीने गुरुवारी जाहीर केले की,” सणासुदीच्या काळात ग्राहकांना 6.66 टक्के सर्वात कमी व्याज दराने होमलोन दिले जाईल. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे होमलोन घेऊ शकतो.” जुलै 2021 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की,” नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे होमलोन घेऊ शकतात. कंपनीने आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवली आहे.”
कोणत्या ग्राहकांना होमलोन मिळेल?
LIC हाऊसिंगने म्हटले आहे की,” या नवीन ऑफर अंतर्गत, 700 किंवा त्यापेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदराने होमलोन दिले जाईल.” Salaried Person, Professionals आणि Self-Employed देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.” 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान मंजूर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व होमलोन वर 6.66 टक्के दराने व्याज आकारले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी ग्राहकांना पहिला हप्ता मिळेल.
कर्जाची रक्कम वाढवून काय फायदा होईल?
LIC हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. विश्वनाथ गौर म्हणाले की,”यापूर्वी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनवर 6.66 टक्के व्याज आकारले जात होते. आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांना स्वस्त दरात होमलोन देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. तसेच, याद्वारे ग्राहक स्वतःसाठी एक मोठे आणि चांगले घर देखील खरेदी करू शकतील.
प्रॉसेसिंग फीमध्ये सूट मिळेल का?
घर खरेदीसाठी कर्ज पुरवणाऱ्या या कंपनीने प्रॉसेसिंग फीमध्ये कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के सूट देखील जाहीर केली आहे. मात्र, या अंतर्गत ग्राहकांना जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासह, पेन्शन लाभ योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना 6 EMI मधून सूट मिळणार आहे. ग्राहक सहजपणे होमलोन साठी अर्ज करू शकतात आणि कंपनीचे App HomY द्वारे मान्यता मिळवू शकतात.