हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC चे देशभरात करोडो ग्राहक आहेत. या विमा कंपनीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ऑफर केल्या जातात. गेल्या महिन्यातच LIC कडून बचत जीवन विमा पॉलिसी लाँच करण्यात आली होती. ज्या अंतर्गत ग्राहकाला विम्याच्या मुदतीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकरकमी रक्कम मिळते, ज्याला बेसिक सम ए श्युअर्ड असेही म्हणतात. जे कमीत कमी 2 लाख रुपये तर जास्तीत जास्त 5 लाख रुपये आहे.
या पॉलिसीची खास बाब अशी कि, यामध्ये मॅच्युरिटीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल. एका उदाहरणाद्वारे हे समजून घ्या, जे आपण 18 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली तर फक्त 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. तसेच या पॉलिसीमध्ये, कमीत कमी 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. त्याच वेळी, जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकेल. ही पॉलिसी 15-20 वर्षांसाठी खरेदी करता येऊ शकेल.
किती रिटर्न मिळेल ???
जर या पॉलिसीमध्ये वयाच्या 28 व्या वर्षापासून वार्षिकरित्या 12,083 रुपये जमा केले आणि हा प्लॅन 18 वर्षे जुना असेल तर मॅच्युरिटीवर 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. यामध्ये 4-5 टक्के व्याज मिळेल. या पॉलिसीमध्ये, मूळ विमा रक्कम किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट डेथ बेनिफिट उपलब्ध आहे. यामध्ये, भरायची रक्कम मृत्यूच्या तारखेला जमा केलेल्या प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी नसेल याची खात्री केली जाते.
15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी
LIC चे अध्यक्ष एमआर कुमार यांनी या पॉलिसी बाबत बोलताना सांगितले की,” लॉन्च झाल्यापासून अवघ्या 10-15 दिवसांत याच्या 50,000 पॉलिसी विकल्या गेल्या आहेत.” हे जाणून घ्या कि, जानेवारी 2023 मध्ये याची सुरुवात झाली होती. कुमार पुढे म्हणाले की,” कंपनी आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पोर्टफोलिओ मिक्सिंगवर लक्ष केंद्रित करत आहे.”