LIC IPO Price : देशातील सर्वात मोठा IPO आजपासून खुला; कमीत कमी ‘इतके’ रुपये लावावे लागणार

LIC IPO Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची प्रतिक्षा आता संपली असून आजपासून तुम्ही LIC IPO (LIC IPO Price) मध्ये अर्ज करू शकता LIC चा IPO 4 मे ते 9 मे पर्यंत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, LIC IPO मध्ये ३ श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे पॉलिसीधारक, LIC कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार…. . या IPO साठी अर्ज करण्यासाठी किती पैसे गुंतवावे लागतील. तसेच किती शेअर्स मिळण्याची शक्यता आहे? यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात येत आहेत. आज आपण जाणून घेऊया तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे

जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, म्हणजेच तुम्ही एलआयसी विमाधारक असाल, तर तुम्हाला आयपीओमध्ये आरक्षणासह किमतीत सूट मिळेल. LIC पॉलिसी धारकाला या IPO मध्ये 10 टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय, पॉलिसीधारकांसाठी IPO (LIC IPO Price) मध्ये प्रति शेअर 60 रुपयांची सूट असेल.

पॉलिसीधारकांना इतका पैसा गुंतवावा लागेल- (LIC IPO Price) 

तुम्ही LIC पॉलिसीधारक असाल तर IPO मध्ये किती पैसे गुंतवावे लागतील हे आपण जाणून घेऊ. LIC IPO चा प्राइस बँड रु. 902 ते रु. 949 च्या रेंजमध्‍ये आहे आणि त्यात 15 शेअर्स आहेत. तुम्ही पॉलिसीधारक कोट्यातून IPO (LIC IPO Price) मध्ये अर्ज केल्यास, वरच्या किंमतीच्या बँडनुसार (949-60=889×15= रु 13,335) म्हणजेच एकूण रु. 13,335 गुंतवावे लागतील. अशाप्रकारे, पॉलिसीधारकाला एका लॉट IPO च्या साठी एकूण 900 रुपयांची सूट मिळेल.

LIC कर्मचाऱ्यांना किती सूट मिळेल-

त्याच वेळी, या IPO मध्ये अर्ज केल्यावर LIC कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, वरच्या प्राइस बँडनुसार, त्यांना एका लॉटच्या अर्जावर 13560 रुपये द्यावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार आणि LIC कर्मचारी एक लॉट अर्ज केल्यावर 675 रुपये वाचवू शकतील . तुम्ही LIC पॉलिसीधारक आणि कर्मचारी नसल्यास, वरच्या किंमतीच्या बँडनुसार, 14,235 रुपये गुंतवावे लागतील. IPO चा इश्यू साईझ 21,000 कोटी रुपये आहे आणि IPO द्वारे सुमारे 22.14 कोटी शेअर्स विकले जातील.

एलआयसी IPO साठी (LIC IPO Price) अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा- तुम्ही आयपीओसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला रिटेल इन्व्हेस्टर श्रेणीमध्ये तीन पर्याय मिळतील, ते योग्यरित्या निवडा. 1. पॉलिसीधारक 2. कर्मचारी 3. नवीन

पर्याय 1) LIC पॉलिसीधारक असाल तर –

पहिला पर्याय तुम्ही LIC पॉलिसीधारक असाल तर पॉलिसीधारक श्रेणी निवडा. ही श्रेणी निवडून, तुम्हाला LIC IPO मध्ये 10 टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय, पॉलिसीधारकांसाठी आयपीओमध्ये प्रति शेअर 60 रुपयांची सूट असेल.

पर्याय 2) तुम्ही LIC कर्मचारी असाल तर –

दुसरीकडे, जर तुम्ही एलआयसीचे कर्मचारी (LIC IPO Price) असाल तर तुम्हाला कर्मचारी श्रेणीवर क्लिक करावे लागेल. या IPO मध्ये अर्ज केल्यावर LIC कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ४५ रुपयांची सूट मिळेल.

पर्याय 3) दोन्हीही नसेल तर-

तिसरा पर्याय म्हणजे, तुम्ही LIC पॉलिसीधारक नसल्यास, किंवा तुम्ही LIC चे कर्मचारी नसाल, तर तुम्हाला सामान्य श्रेणी निवडावी लागेल. तुम्ही या श्रेणीमध्ये अर्ज केल्यास, तुम्हाला वरच्या किमतीनुसार एकूण 14,235 रुपये द्यावे लागतील.

हे पण वाचा :

LIC IPO : देशातील सर्वात मोठा IPO उद्या लॉन्च होणार; जाणून घ्या याबद्दलच्या महत्वाच्या गोष्ट

LIC IPO Date : तुम्हीसुद्धा LIC चा IPO घेण्याचा विचार करत आहात काय? सर्व महत्वाची माहिती फक्त 2 मिनिटांत जाणुन घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर!! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता