हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC Jeevan Labh Policy : देशातील सर्वांत मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC ने देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये चांगला रिटर्न मिळत असल्यामुळे लोकांमध्ये त्या चांगल्याच लोकप्रिय देखील आहेत. जर आपल्यालाही एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल तर LIC Jeevan Labh Policy हा चांगला पर्याय ठरू शकेल. एलआयसीच्या या योजनेमध्ये दररोज 250 रुपयांची गुंतवणूक करून 54 लाखांपर्यंतचा रिटर्न मिळू शकेल. यामध्ये कोणतीही जोखीम नसेल. त्याचबरोबर निश्चित नफा देखील मिळेल. ज्यामुळे या योजनेत गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येईल.
इथे हे लक्षात घ्या कि, LIC कडून देण्यात येणारी ही एक नॉन लिंक्ड योजना आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते. इतकेच नाही तर यामध्ये जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतही दिली जाते. तसेच या योजनेची खास बाब अशी कि यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार मिळतो.
LIC Jeevan Labh Policy चे फायदे जाणून घ्या
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये आपल्याला रिव्हर्शनरी बोनस आणि मॅच्युरिटीवर फायनल एडिशनल बोनस मिळतो.
8 ते 59 वयोगटातील कोणत्याही नागरिकाला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते.
यामध्ये, 59 वर्षांच्या व्यक्तीला 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडता येते, जेणेकरून मॅच्युरिटीच्या वेळी त्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त होणार नाही.
यामध्ये पॉलिसीधारकाला 10, 13 आणि 16 वर्षांसाठी पैसे जमा करता येतील, ज्यांना 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर मोठा फंड मिळेल.
अशा प्रकारे कॅल्क्युलेशन समजून घ्या
समजा जर एखाद्याने वयाच्या 25व्या वर्षी LIC Jeevan Labh Policy घेतली.
आता तो दररोज 256 रुपयांची बचत करत असेल तर त्याची दरमहा गुंतवणूक 7700 रुपये होईल.
म्हणजेच त्याची वार्षिक गुंतवणूक 92,400 रुपये असेल.
आता जर या गुंतवणूकदाराने 25 वर्षे गुंतवणूक केली तर त्याला सुमारे 20 लाख रुपये मिळतील.
तसेच मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसी धारकाला 54.50 लाख रुपयांची मोठी रक्कम रिटर्न म्हणून मिळेल.
अशा प्रकारे पॉलिसीधारकाला LIC Jeevan Labh Policy च्या मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/Jeevan-Labh
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा