LIC New Scheme | आपल्या देशामध्ये अनेक विमा कंपन्या आहेत. परंतु त्यात LIC ही सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ने सुमारे 58 हजार कोटी रुपयांची एक योजना बनवलेली आहे. यासाठी LIC त्यांच्या मालकीच्या जमिनी आणि इमारती विकणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार LIC (LIC New Scheme) ही कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेली मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. या कंपनीच्या अनेक ठिकाणी विविध इमारती देखील आहेत. भारतातील श्रीमंतीच्याबाबत विचार केला तर रेल्वे आणि लष्करानंतर LIC कडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे. परंतु आता LIC ला ही मालमत्ता का विकायची आहे?असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. ते आपण जाणून घेणार आहोत. LIC ची देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये मालमत्ता आहे. दिल्ली, कोलकत्ता त्याचप्रमाणे मुंबई या ठिकाणी LIC ची मोठी मालमत्ता आहे. LIC कडे एकूण तब्बल 51 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा एकूण 36,397 कोटी रुपये एवढा होता. परंतु जर LIC ने त्यांची मालमत्ता विकली, तर त्यांच्या कंपनीच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. LIC ने ही मालमत्ता विकली, तर त्या नवीन मालकास इमारतीचा पुनर्विकास करण्याची देखील परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे मालमत्तेचे व्यवस्थापन आणि कमाई करण्यासाठी नवीन कंपनी देखील बनवू शकते. या कंपनीच्या काही इमारती अगदी प्राईम लोकेशनवर आहे. परंतु कंपनीला त्यांच्या कायद्यांमध्ये काही बदल करावे लागतील.
LIC या कंपनीने या आधी देखील एकदा ही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची ही योजना यशस्वी झाली नाही LIC च्या अनेक इमारती आणि मालमत्ता कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यातून सुटका मिळवण्यासाठी LIC ही योजना आणत आहे.