LIC ची विशेष योजना, एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर दरमहा मिळवा 8000 रुपये पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LIC ची जीवनशांती योजनेचे (Jeevan Shanti Scheme) वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये मिळणारी पेन्शन हे आहे. ही पॉलिसी पेन्शन (Pension) द्वारे ग्राहकांना भविष्यातील सुरक्षा प्रदान करते. या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी समजून घ्यायचे झाले तर, एखाद्या 45 वर्षांच्या व्यक्तीने जर या पॉलिसीमध्ये 10,00,000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वर्षाकाठी 74,300 पेन्शन मिळेल. आपल्याकडे पेन्शन त्वरित किंवा 5, 10, 15 किंवा 20 वर्षानंतर सुरू करण्याचा पर्याय असेल. पेन्शनची रक्कम 5, 10, 15 किंवा 20 वर्षांच्या पर्यायांमध्ये वाढेल परंतु त्यामध्ये काही अटी आहेत. LIC ची जीवन शांती याेजना एक नॉन लिंक्ड याेजना आहे. तसेच, ही एकल प्रीमियम वार्षिकी योजना आहे ज्यात विमाधारकास तात्काळ वार्षिकी किंवा स्थगित वार्षिकी निवडण्याचा पर्याय असतो.

ऑनलाइन आणि ऑफलाइन पॉलिसी खरेदी करा
ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. LIC ची जीवन शांती ही एक सर्वसमावेशक वार्षिकी योजना आहे ज्यात त्या व्यक्तीस आणि त्याच्या कुटुंबास देखील लाभ मिळतील.

पॉलिसीचे वैशिष्ट्य
LIC ची ‘जीवन शांती’ एक अप्रतिम प्रोडक्ट आहे. ही सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेंशन योजना आहे. तिचे वैशिष्ट्य असे आहेत …
>> लोन सुविधा
>> 3 महिन्यांनंतर कोणत्याही मेडिकल डॉक्यूमेंट (विना) सरेंडर केले जाईल
>> त्वरित किंवा कधीही 1 ते 20 वर्षांच्या दरम्यान पेन्शन सुरू करा
>> जॉइंट लाइफ ऑप्शन तुम्ही कोणत्याही जवळच्या नातेवाईकाचा समावेश करू शकता.
>> जर तुम्ही 10 लाखांच्या गुंतवणूकीवर 5 वर्षानंतर निवृत्तीवेतन सुरू केली तर 9.18 टक्के रिटर्न नुसार वार्षिक पेन्शन मिळते.

या वयाची लोकं लाभ घेऊ शकतात
>> या योजनेत किमान 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 85 वर्षे असलेली सहभागी होऊ शकतात. जीवन शांती योजनेत पेन्शन सुरू झाल्याच्या 1 वर्षानंतर आणि सरेंडर नंतर 3 महिन्यांनंतर पेन्शन सुरू करता येते.

>> तत्काळ आणि स्थगित वार्षिकी दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना वार्षिक दरांची हमी दिली जाईल. योजने अंतर्गत विविध वार्षिकी पर्याय आणि वार्षिकी पेमेंट देण्याच्या पद्धती उपलब्ध आहेत. एकदा निवडल्यानंतर पर्याय बदलता येणार नाही.

>> ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाईनही खरेदी करता येईल. ही योजना एलआयसीची जुनी योजना जीवन अक्षय सारखीच आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment