गतवर्षीप्रमाणेच 2022 मध्येही महागाई रडवणार, महामारीचा बाजारावर काय परिणाम झाला हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । या वर्षी म्हणजे 2022 मध्येही सतत वाढणाऱ्या महागाईपासून दिलासा मिळणार नाही. त्याचा परिणाम नुसता सर्वसामान्यांवरच होणार नाही तर बाजारावरही होणार आहे. जेपी मॉर्गनच्या इंस्टिट्यूशनल ट्रेडिंग क्लाइंट्सच्या सर्व्हेमध्ये असे म्हटले गेले आहे की, या वर्षीही महागाईचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल.

जेपी मॉर्गन ने नोव्हेंबर 2021 मध्ये हे सर्व्हे केले. यामध्ये सहभागी असलेल्या 718 इंस्टिट्यूशनल ट्रेडिंग क्लाइंट्सपैकी सुमारे 48 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, या वर्षातील चलनवाढीचा सर्वाधिक परिणाम बाजारावर होईल. बाजाराची दिशा ठरवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावेल. जगातील सर्वच देश महागाईने हैराण झाले आहेत. गतवर्षीच्या या सर्व्हेमध्ये महामारीचा सर्वाधिक फटका बाजाराला बसल्याचे सांगण्यात आले होते.

हा ट्रेंड दोन वर्षे राहील
या सर्व्हेमध्ये सामील असलेल्या 13 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, अर्थव्यवस्थेतील विस्कळीतपणा आणि महामारी हे इतर घटक असतील, ज्याचा महागाईनंतर बाजारावर सर्वात मोठा परिणाम होईल. अलिकडच्या वर्षांत इलेक्ट्रॉनिक चॅनेलद्वारे व्यापारात प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सर्व मालमत्ता वर्गातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की पुढील दोन वर्षांतही हाच ट्रेंड दिसून येईल.

बाजारातील अस्थिरता
जेपी मॉर्गनच्या स्कॉट वॉकरच्या मते, महामारीमुळे आपल्याला गेल्या दोन वर्षांत असामान्य टप्प्यातून जावे लागले आहे. क्लाइंट्स ऑफिसेस ऐवजी वर्क फ्रॉम होम करत आहेत. बाजारातही बरीच अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत आपण इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगमध्ये मोठी वाढ पाहिली आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 29 टक्के व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की,”मोबाइल ट्रेडिंग अ‍ॅप्स पुढील वर्षी बाजारात लक्षणीयरित्या परिणाम दाखवतील. भविष्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मोबाइल तंत्रज्ञानावर मात करताना दिसतील.”

ब्लॉकचेनची मुख्य भूमिका
सर्व्हे केलेल्या जवळपास 50 टक्के व्यापाऱ्यांनी सांगितले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे पुढील 3 वर्षांच्या फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये बाजारावर प्रभाव टाकणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणून उदयास येतील. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 24 टक्के व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, ब्लॉकचेन तंत्रज्ञान बाजारपेठेला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

Leave a Comment