ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी Linde India आणि Tata Group ची भागीदारी, 24 क्रायोजेनिक कंटेनर्स मिळवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एकीकडे कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ (Corona) तर दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता यामुळे वाढलेला हाहाकार. आत्तापर्यंत देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे शेकडो मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर्सच्या काळ्या बाजाराची( Black market) बातमी त्रासदायक आहे. या सर्वांच्या दरम्यान आता खासगी कंपन्यांनीही मदतीचा हात पुढे करण्यास सुरूवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या जामनगर युनिटमधून ऑक्सिजन पुरवते आहे. त्याचबरोबर आता औद्योगिक गॅस कंपनी लिंडे इंडियाने (Linde India) म्हटले आहे की,” टाटा ग्रुप (Tata Group) च्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून ऑक्सिजन वाहतुकीसाठी त्यांनी 24 क्रायोजेनिक कंटेनर घेतले आहेत. या कंटेनरद्वारे संपूर्ण देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.” परदेशातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे.

ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचेल
प्रत्येक कंटेनरमध्ये 20 टन लिक्विड ऑक्सिजन ठेवण्याची क्षमता असते. लिंडे इंडिया आवश्यक असलेल्या या रुग्णालयांमध्ये या मॅन्यूफॅक्चरिंग फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन घेऊन जाईल. त्याशिवाय ऑक्सिजनची कमतरता असलेल्या दुर्गम भागात अंतरिम ऑक्सिजन स्टोरेजच्या (interim oxygen storage) स्वरूपात हे कंटेनर उपयुक्त ठरणारे आहेत.

कंटेनर हवाई मार्गाने देशाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचले आहेत
कंपनीच्या निवेदनानुसार हे कंटेनर हवाई मार्गाने देशाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर पोहोचले आहेत. आता लिंडे इंडिया येथून आपली लिक्विड ऑक्सिजन मॅन्यूफॅक्चरिंग फॅसिलिटी पाठवेल. या सुविधेमध्ये, या क्रायोजेनिक ISO containers ला कंडिशन केले जाईल आणि लिक्विड मेडिकल ऑक्सीजन वापरासाठी प्रमाणित (certified) केले जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यासह डझन कंपन्यांनी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरु केला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group