Liquor Banned In Pune : मोठी बातमी!! पुण्यात दारुविक्रीला बंदी; जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आदेश

Liquor Banned In Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Liquor Banned In Pune । आज गणेशोत्सव असून सर्वाच्याच घरी गणरायाचे आगमन झालं आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. गणेशभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना पुणे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात आज म्हणजे २७ ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ११ दिवसांसाठी खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दारू विक्रीवर पूर्ण बंदी जाहीर केली आहे.

दारूबंदीमागची कारणे काय ? Liquor Banned In Pune

पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक प्रतिष्ठित गणपती मंडळे आहेत. तसेच आसपासच्या शहरातून सुद्धा पुण्यातील गणेश मंडळे बघण्यासाठी, देखावे बघण्यासाठी आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची पाऊले पुण्याकडे वळत असतात. अशावेळी कोणताही चुकीचा प्रकार घडू नये, दारू पिऊन कोणी दंगा करू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मद्यविक्रीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि अनंत चतुर्थीला म्हणजेच ६ सप्टेंबरला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दारू दुकाने बंद राहतील (Liquor Banned In Pune) असे आदेश देण्यात आले आहेत. 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील दुकान बंद राहणार आहेत.

जे कोणी या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पुण्यातील गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यात अनेक मोठमोठी गणेश मंडळे आहेत जिथे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत केलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया!! आला रे आला गणपती आला अशा घोषणा देत गणेशभक्त अक्षरशः तल्लीन झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण गणरायाच्या भक्तिमय वातावरणात एकरूप झाले आहेत.