हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात आणि महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांची (Liquor) संख्या काही कमी नाही. अगदी कॉलेज मधील मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे दारू आणि बिअर व्यवसाय देशात जोरात चालतो. परंतु मागील काही दिवसांपासून बिअरचा (Beer) खप मोठ्या प्रमाणात कमी झाला असून दुसरीकडे लोकांचा कल हा हार्ड ड्रिंककडे (Hard Drink) वळत असल्याचे दिसत आहे. यामागील कारणही तसेच खास आहे. महाराष्ट्रात 2014 नंतर मोठ्या प्रमाणात बिअरच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. बिअरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे बिअर आणि इतर प्रकारच्या मद्याच्या किंमतीत फारसी ताफावत उरलेली नाही. त्यामुळे मद्यप्रेमी बिअरपेक्षा अन्य प्रकारचे हार्ड ड्रिंक विकत घेणे पसंत करताना दिसून येत आहेत.
2014 ते 2022 च्या दरम्यान बाजारात 650 मिलीलीटर स्ट्रॉंग बिअरच्या किंमतीत तब्बल 64% इतकी वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच दुसरीकडे बघायला गेले तर 180 मिलीलीटर हार्ड ड्रिंकच्या किंमतीत फक्त 10-20% वाढ नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात बिअरवर मोठ्या प्रमाणात कर वाढवण्यात आला. महाराष्ट्रात मागील ७-८ वर्षात बिअरवरील अबकारी करामध्ये तब्बल 30% पेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. त्या तुलनेत अन्य हार्ड ड्रिंक्सवर अबकारी करात त्या तुलनेने वाढ नोंदवली गेलेली नाही.
खरं तर दारुपेक्षा बिअर हे तुलनेने अधिक सुरक्षित मद्य असते त्यामुळे अनेकांना हार्ड ड्रिंकपेक्षा बिअर पिणे जास्त सोयीचे वाटते. यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये बिअरला मोठ्या प्रमाणात पसंदी देण्यात येत होती. मात्र बिअरच्या वाढत्या किंमती लक्षात घेता लोक जवळपास बिअरच्याच किंमतीत मिळत असलेले हार्ड ड्रिंक्स विकत घेणे योग्य मानत आहेत. यामुळे बिअर इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पॉलिसी मेकर्सनी याबाबत काही निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे