मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत २३ पैकी २१ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत सातारा आणि पालघर या दोन जागांवरील उमेदवार जाहीर केला नाही.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी –
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण – श्रीकांत शिंदे
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशील माने
नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
बुलडाणा – प्रतापराव जाधव
रामटेक – कृपाल तुमाणे
अमरावती – आनंदराव अडसूळ
परभणी – संजय जाधव
मावळ – श्रीरंग बारणे
हिंगोली – हेमंत पाटील
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्प्यात मतदान होणार आहे. ११ ते २९ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे.
इतर महत्वाचे –
नरेंन्द्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सातारा लोकसभा शिवसेनेकडून लढणार?