Liver Damage | आपले शरीर हे अत्यंत मौल्यवान आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा देखील खूप महत्त्वाचा आहे. परंतु यकृत हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. या अवयवामुळे आपल्या शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरात यकृती अत्यंत महत्त्वाचे काम करते. त्यामध्ये पचन, चयापचय तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून काढून टाकण्याचे काम यकृत करत असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सगळ्या क्रिया योग्य प्रमाणात चालण्यासाठी आपल्या यकृत ही निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे.
आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. खाण्यापिण्याच्या सवयी झोपण्याच्या पद्धती या सगळ्या सवयींमुळे लोकांच्या शरीरावरत आणि पर्यायाने यकृतावर परिणाम होतो. आणि यकृताचे आरोग्य बिघडते. परंतु अनेकवेळा आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. हेच समजत नाही. तुम्ही जर यकृताचा आजार वेळेवर ओळखला नाही, तर नंतर जाऊन तुमचे हे यकृत निकामी होते.
आणि तुम्हाला त्यावेळी काही करता येत नाही. त्यामुळे तुमच्या शरीरात जर अगदी छोट्या छोट्या बदल झाले, तरी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळेल की, तुम्हाला नक्की काय आजार झाला आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण यकृत खराब होण्याआधी त्याची काय लक्षणे असतात हे पाहणार आहोत.
पायांना सूज येणे
जेव्हा तुमच्या यकृताचा जुनाट आजार असतो, तेव्हा तुमच्या पायांमध्ये एक प्रकारचे द्रव्य साचू लागते. आणि त्यानंतर तुमच्या पायांना सूज येते. पायातील शिरांमध्ये वाढलेल्या या दाबामुळे पायामध्ये हे द्रव्य जमा होऊ शकते.
रक्ताच्या उलट्या होणे | Liver Damage
सर तुमचे यकृत निरोगी नसेल, तर तुम्हाला रक्ताच्या उलट्या देखील होतात. त्याचप्रमाणे अन्ननलिका आणि पोटामध्ये अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा हे उलट्या आणि स्टूलमध्ये रक्ताचे प्रमाण असणे. ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे जर यकृताचा तुम्हाला जास्त आजार असेल तर तुमच्या उलट्यांमध्ये रक्त येते.
त्वचेला खाज सुटणे
यकृत निकामी झाल्याचे लक्षणापैकी प्रमुख लक्षण म्हणजे तुमच्या त्वचेला सतत खाज येते. जर तुमच्या त्वचेला सतत खाज येत असेल, तर त्यात काविळीचे लक्षण देखील असू शकते. हे पित्तनलिकातील, स्टोन पित्तनलिकाचा किंवा स्वादुपिंडातील डोक्याचा कर्करोग यांसारखी लक्षणे देखील असतात. त्यामुळे त्वचेला खाज येत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवून घ्या.
पोटात सूज येणे
ओटी पोटात सूज येणे. हे जुनाट यकृताच्या आजारांपैकी एक मुख्य लक्षण आहे. यामध्ये तुमच्या पोटात द्रव्य साचू शकते. पोटात ताण येतो आणि त्यामुळे तुमच्या पोटात दुखू लागते.
झोपेचा त्रास होणे
तुमचे जर यकृत खराब झाले, असतील तर तुमच्या रक्तातील विषाणू पदार्थ झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकते. यकृताचे त्रास असणाऱ्या रुग्णांना अनेकवेळा झोपेचा त्रास होतो. त्यांच्याकडून निद्रानाशाच्या तक्रारी देखील येत असतात.