Livestock Census | राज्यात या तारखेपासून होणार पशुगणनेला सुरुवात; पहिल्यांदाच मोबाईलद्वारे होणार गणना

Livestock Census
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Livestock Census | दर 5 वर्षांनी राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून पशु गणना (Livestock Census) करण्यात येते. यामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये नक्की किती पशु आहेत? याची संख्या मोजली जाते. आताही पशु गणना पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण राज्यात उद्या म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. यावर्षीची ही 21 वी पशु गणना आहे. ही पशु गणना एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबवली जाते. यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना होणार आहे. ही पशु गणना तब्बल चार महिने चालणार आहे. त्यामुळे पशु विभागाकडून आता चांगली तयारी देखील चालू आहे. याबद्दलची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी ही राज्यामध्ये पशुगणना केली जाते. ज्याप्रमाणे देशातील जनतेची जनगणना केली जाते. त्याचप्रमाणे पशु गणना मोहीम देखील राबवली जाते. यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये एक सप्टेंबर ते 31 डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत ही पशु गणना होणार आहे. ही पशु गणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्मार्टफोनच्या माध्यमातून ही जनगणना केली जाणार आहे.

यावर्षी राज्यातील 21 वी पशुगणना (Livestock Census) आहे. याआधी 2019 मध्ये 20 वी पशु गणना झाली होती. यासाठी प्रगनाकारणा टॅबलेट देण्यात आलेले होते. तर त्याआधी पशु गणना ही नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीमध्ये संपूर्ण माहिती नोंदवताना त्यात बराच वेळ देखील जात होता. आता या जनगणने सूत्रता आणण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी एका ॲपची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पशुधनाची माहिती भरू शकता.

या पशुगणनेमध्ये (Livestock Census) गाई वर्ग, म्हशी वर्ग, शेळी, मेंढी, कुकुट अश्व, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाते आणि याच्या आधारावरच शासनाकडून विविध योजना आखल्या जातात. आणि निधी देखील उपलब्ध होतो. त्यामुळे यासाठी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी सांगितले आहे की, नागरिकांनी खरी माहिती द्यावी. आणि या माहिती नुसार पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. औषधांचा पुरवठा केला जातो. याची माहिती दिल्यानंतरच पुढील सहकार्य करता येईल.