कराडचा जनावरांचा बाजार बंद : लम्पी स्कीनमुळे बाजार समितीचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

शेती उत्पन्न बाजार समितीचे बैल बाजार येथे दर गुरुवारी बाजार भरत असतो. मात्र, लम्पी स्कीन या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध / नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी जनावरे बाजार बंद ठेवण्यात आल्या संबधी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा सातारा यांनी दि. 17 जून 2022 अन्वये प्राप्त अधिकारान्वये लम्पी स्कीन या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध / नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे वाघेरी या संसर्ग केंद्रापासून 10 किमी अंतराच्या परिसरातील सर्व गावे बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यास अनुसरून आपत्ती व्यवस्थापन / तहसीलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय लंपी स्किन रोग सनियंत्रण समिती, (ता. कराड) यांच्या आदेशानुसार जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

मौजे वाघेरी या संसर्ग केंद्रापासून १० कि.मी. परिसरात जनावरांची खरेदी / विक्री/वाहतूक/बाजार/जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास कराड येथील जनावरांचा बाजार लंपी रोग प्रादुर्भावामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत हा आदेश दिला आहे. कराड उत्पन्न बाजार समिती ही 10 किमी अंतरात येत असल्याने कराडचा जनावरांचा बाजार बंद राहणार आहे.