हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank कडून आपल्या MCLR मध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवीन व्याजदर 18 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाल्याचे बँकेने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. बँकेने एक वर्षाच्या कालावधीसाठीच्या स्टॅण्डर्ड MCLR रेट मध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून 8.35 टक्के केला आहे. यापूर्वी तो 8.10 टक्क्यांवर होता. पर्सनल, ऑटो आणि होम लोन वरील दर एक वर्षाच्या MCLR च्या आधारावर ठरवले जातात.
हे लक्षात घ्या कि, RBI ने 30 सप्टेंबर रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर Axis Bank ने MCLR दर वाढवले आहेत. एक दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील MCLR देखील 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15-8.30 टक्के करण्यात आला आहे. MCLR दोन वर्षांसाठी 8.45 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.50 टक्के असेल.
कर्ज महागणार
Axis Bank ने सांगितले की, हे दर पुढील पुनरावलोकनापर्यंत व्हॅलिड असतील. म्हणजेच आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहेत. ज्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांच्या EMI मध्येही वाढ होणार आहे. हे लक्षात घ्या कि, नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने देखील आपल्या MCLR दरात वाढ केली होती.
FD वरील नवीन व्याजदर
Axis Bank कडून आता सर्वसामान्यांना 6.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.90 टक्के व्याजदरासह 15 महिन्यांची FD ऑफर केली जय आहे. या नवीन दरांनुसार, आता Axis Bank 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के तर 30 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याजदर देत आहे.
तसेच आता 3 ते 6 महिन्यांच्या Axis Bank च्या एफडीवर 3.75 टक्के, 6 ते 9 महिन्यांच्या FD वर 4.65 टक्के, 9 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी 4.75 टक्के, 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांच्या एफडीवर 5.45 टक्के आणि 15 महिन्यांच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज दिले जाईल.
आता Axis Bank कडून 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर 6.15 टक्के, 2 ते 5 वर्षांच्या FD वर, बँक आता 5.70 टक्के आणि पाच ते दहा वर्षांच्या FD वर 5.75 टक्के व्याजदर देत आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Kotak Mahindra Bank
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Kotak Mahindra Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/retail/loans/personal-loan/interest-rates-charges
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर