मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. पण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे काही सोपं काम नाही. कारण लोकलची गर्दी… नवख्या माणसाला तर लोकलने प्रवास म्हणजे नको रे बाबा ! असे होईल मात्र लोकलच्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर व्हावा त्यांना कोणताही अडथळा प्रवास करताना येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.
मध्य रेल्वेने मागच्या काही दिवसांमध्ये वेळापत्रकांमध्ये बदल केला आहे आणि हा बदल 5 ऑक्टोबर पासून करण्यात आला आहे. आता पश्चिम रेल्वेने देखील नवीन वेळापत्रक तयार केलं असून यानुसार पश्चिम रेल्वेवर 12 फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सध्या सुरू असलेल्या सहा फेऱ्यांना पुढे सुरू ठेवण्यात आल्या आहेत तर 10 लोकलचं अपडेशन करण्यात येणार असून 12 डब्यांच्या ऐवजी आता लोकल 15 डबे जोडले जाणार आहेत. लोकलच्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक सुखदायक ठरणार आहे. कारण लोकलची गर्दी पाहता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी अनेक प्रवाशांकडून केली जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या सध्या 1394 इतकी आहे. ही संख्या वाढून 1406 पर्यंत होणार आहे. शिवाय विरार ते चर्चगेट अशी फास्ट लोकल नव्याने सुरू करण्यात येणार आहे. तर डहाणू रोड ते विरार पर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जाणार आहेत अंधेरी गोरेगाव आणि बोरीवली येथून चर्चगेट साठी एक धीमी लोकल चालवण्यात येणार आहे. तर चर्चगेट ते नालासोपारा पर्यंत फास्ट आणि चर्चगेट ते गोरेगाव अशी दोन स्लो लोकल चालवण्यात येणार आहेत.
कधीपासून लागू होणार नवे वेळापत्रक ?
चर्चगेट ते अंधेरी पर्यंत एक धीमी लोकल आणि विरार ते डहाणू रोड पर्यंत दोन धीम्या लोकल चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक 12 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. लोकलच्या बारा फेऱ्या वाढवल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्याचा विचार करता पश्चिम रेल्वे वरील मालाड ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यासाठी मेजर ब्लॉकच आयोजन करण्यात येणार आहे.