मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मुंबईकरांचे जीवन हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते . मात्र मागच्या काही दिवसांमध्ये लोकलच्या प्रवाशांची संख्या खूपच वाढली आहे. त्यामुळे लोकल मधून प्रवास करताना अगदी धक्काबुक्की करीत प्रवास करावा लागतो. लोकलच्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा असे प्रयत्न रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. आता मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. कारण या स्थानकांवर जलद लोकल गाडयांना थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 ऑक्टोबर पासून गाड्यांना थांबा
या मार्गावर ऑफिस करिता ये -जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. म्हणूनच तोच विचार क्राऊन सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रत्येकी एक लोकलला थांबा मिळणार आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024पासून या गाड्यांना थांबा मिळणार आहे. त्यामुळं या स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या गाड्या थांबणार ?
कळवा रेल्वे स्थानकात सकाळी 8.56 वाजता अंबरनाथहून – मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी 9.23 वाजता आसनगावहून – मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.29 वाजता मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.47 वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
त्याचप्रमाणे आता मुंबई सीएसएमटी वरून शेवटची कर्जत लोकल रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी सुटेल तर शेवटची कसारा लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी सुटेल.