आनेवाडी, खेडशिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी : खा. श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लोकसभेत खा. श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पाटण, कराड येथील पूलांची कामे लवकर पूर्ण करावीत. आनेवाडी, खेडशिवापूर टोलनाका परिसरातील स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी. वेळे येथे रस्ता ओलंडण्यासाठी नवीन पूल बांधावा. महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करावेत. तसेच मार्गाच्या कामाचा दर्जा सुधारावा यासह अन्य मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

लोकसभेत सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना खा. पाटील यांनी या मागण्या केल्या. ते म्हणाले, पाटण शहराजवळील केरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पूलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असून ते काम लवकर पूर्ण व्हावे करण्यात यावे. विजापूर ते गुहागर मार्गावरील कराड शहराजवळ कृष्णा नदीवर असणा-या पूलाचे काम देखील दोनतीन वर्षापासून सुरू आहे. मात्र ते काम अद्याप अपूर्ण असून त्या कामाला गती द्यावी. टोलनाक्याच्या २० किमी अंतरामधील नागरिकांना टोलची सवलत मिळावी. तेथील स्थानिक रहिवाशी, व्यापाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पास दिले जातात. परंतु ती सुविधा काही लोकांनाच मिळते. तर कित्येकजण त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संबंधित प्रत्येक व्यक्तीला सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अशी एखादी व्यवस्था निर्माण करावी जेणे करून त्याची सुविधा त्यांना घेता येईल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1065659300958278/?app=fbl

 

खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावर सतत कोंडी होत असल्याने महामार्गावर लांबचलांब रांगा लागत आहेत. टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी सुधारीत यंत्रणा बसवून सुविधा निर्माण करावी म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे त्यांनी सुचवले.

Leave a Comment