Wednesday, October 5, 2022

Buy now

“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई नको, असे आदेश दिले आहेत. थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवय जडली आहे.”,असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अनधिकृत बंगल्याबाबत हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर ट्विट केले. यावेळी भातखलकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई नको, असे आदेश दिले आहेत. थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवय जडली आहे.”

यावेळी भातखळकर यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारने राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवले नाही. एसटी कामगारांचा विलीनीकरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. त्यामुळे या सरकारला राज्यातील जनतेच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचंगे दिसते, असेही भातखळकर यांनी म्हंटले.