सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवला; शिवजयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

balasaheb patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो रोखण्यासाठी सद्यस्थितीत चालू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत तसेच ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तिथीप्रमाणे शिवजयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन राहणार आहे.

सातारा जिल्ह्यात दिनांक 14, 19, 20 व 22 एप्रिल रोजी दिलेले आदेश 10 मे 2021 पर्यंत 7 वाजेपर्यंत लागू करण्यात आले होते. आता त्या आदेशात बदल करत निर्बंध तसेच ठेवून 10 ऐवजी 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन वाढविला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2972837859710384

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदरील माहीती दिली. सातारा जिल्ह्यात निर्बंधाविषयी माहीती मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, विभाग प्रमुख, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत- नगरपालिका, गटविकास अधिकारी आणि जिल्हा माहीती अधिकारी यांना कळविण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.