लॉकडाऊन काळात FMCG कंपन्यांच्या ‘या’ उत्पादनांच्या खपात मोठी वाढ

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात देशातील अनेक व्यवसाय आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. या काळात भारतीय लोकांचा खरेदीचा ट्रेंडही बदलल्याचे निदर्शनास आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ब्रेड, चीज, कॉफी आणि जॅमच्या खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. तर आइस्क्रीम आणि फ्रुट केकच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. अशाप्रकारचे खरेदीचे अनेक नवे ट्रेंड आता सेट होताना दिसत आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL)
हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ही भारतातील सर्वात मोठी FMCG (Fast-Moving Consumer Goods) कंपनी असून एप्रिल ते जून या तिमाहीत जॅम आणि सॉसच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. तसंच लाइफबॉय सॅनिटायझर आणि हँडवॉशच्या विक्रीतही वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितलं की, लॉकडाऊन दरम्यान जाम आणि केचअप-सॉसच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ स्वाभाविक आहे. कारण अनेक लोक त्यांच्या घरांत, आपल्या लहान मुलांसोबत आहेत. त्यामुळे या उत्पादनांची मागणी मोठी वाढली आहे. तसंत या तिमाहीत आरोग्य, स्वच्छतेविषयी उत्पादनं आणि पोषण आहाराच्या मागणीतही वाढ झाली आहे.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड
मुंबईतील गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कीटकनाशकांच्या वस्तूंमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तर भारतीय शहरांमध्ये डासांचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी अनेकांकडून कीटकनाशकांच्या वस्तूंमध्ये वाढीची नोंद करण्यात आली आहे.

आयटीसी लिमिटेडने
कोलकातास्थित आयटीसी लिमिटेडने, एप्रिलच्या मध्यापासून अन्न आणि वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. तसंच गुडगावस्थित नेस्लेने, गेल्या तिमाहीत इंस्टंट नूडल्स आणि कॉफी खरेदीसाठी ग्राहकांचा कल असल्याचं त्यांनी सांगितलं. मॅगी नूडल्सच्या मागणीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या काळात ब्रिटानियाच्या कमाईबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले की, बिस्किटांपेक्षा ब्रेडचा खप मोठ्या प्रमाणात होता. तसंच डेअरी प्रोडक्ट्समध्ये चीजची मोठी मागणी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here