लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू सुरू झालं पाहिजे हे माझं मत आहे. मौजमजेसाठी किंवा कॅफेत जाण्यासाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल झालंच पाहिजे, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊन घाईघाईत उठवून चालणार नाही.तर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवलं पाहिजे. सांगतानाच लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य कळवा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

यावेळी सुप्रिया सुळे यांना परीक्षांसंदेर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या, ”सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment