हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. विदर्भातील अमरावती यवतमाळ नागपूर आणि अकोल्यात कोरोना वेगात पसरत आहे. दरम्यान अमरावती मध्ये लॉक डाउन केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यात देखील लॉक डाउनची घोषणा करण्यात आली आहे.
संपूर्ण अकोला जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला नाही तर अकोला शहर, मुर्तीजापूर शहर आणि अकोट शहर अशा तीन ठिकाणी हा लॉकडाऊन असेल. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनाश्यक वस्तुंची दुकानं सुरु रहातील. इतर सगळी दुकानं बंद रहातील. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश काढले आहेत. 23 तारखेपासून लॉकडाऊन असल्यामुळे जनतेकडं आणखी दोन दिवस असतील. त्या काळात त्यांना हवं त्या गोष्टींची तयारी करु शकतात.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होताना दिसतो आहे. दिवसभरात 288 कोरोना बाधित झालेत. त्यात सकाळी 222 तर संध्याकाळी 66 जण बाधित झाल्याचं प्रशासनानं माहिती दिली आहे. जिल्ह्यातला कोरोनाबाधितांचा आकडा हा 13 हजार 935 वर गेला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’