कृष्णा जलसिंचन अधिका-यांच्या भोंगळ कारभार विरोधात आंदोलन करणार ; रणजीत कसबे यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

कृष्णा जलसिंचन विभाग अनधिकृत हॉटेल व्यावसायिकाला पाठीशी घालत असून त्यामुळे शासनाची फसवणूक होत आहे. हॉटेल जलसागर हे हॉटेल अनाधिकृत असल्याने अनेकवेळा आपण आक्रमक भूमिकाही घेतल्या आहेत. तसेच वारंवार आंदोलनही केले आहे. कृष्णा जलसिंचन विभागाकडे सढळ पुरावे असताना देखील पंधरा दिवसाचा स्टे आलाच कसा? असा सवाल करीत या हॉटेलवर 15 डिसेंबर पर्यंत कारवाई झाली नाही तर पुण्याच्या प्रदेश कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकजनशक्ती पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष रणजीत कसबे यांनी दिला.

रणजीत कसबे यांनी इशाऱ्याचे निवेदन कृष्णा जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात कसबे यांनी म्हंटले आहे की, सातारा येथील ओतले जलसागर हा खूप चर्चेचा विषय आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या अनधिकृत हॉटेलच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही लढा देत आहोत. पहिल्यादा आम्ही ६ ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर आम्ही १५ ऑगस्ट रोजी आंदोलनही केले. या प्रकरणाबाबत सांगायचे झाले तर अधिकाऱ्यांकडून आम्ही कारवाई करतो असे सांगत कागदोपत्री घोडे नाचवायचे काम चालू आहे.

याबाबत आम्ही आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी २५ रोजी सभनधीत हॉटेल चालकांना नोटीस पाठवले आंही तुम्ही अनधिकृत बांधकाम कडून घेतले नाही तर आम्ही कारवाई करू. मात्र, तसे अधिकाऱ्यांनी केले नाही. संबंधित हॉटेल चालक हा जावई असल्यासारखे त्याच्यासोबत वागत आहेत. संबंधित हॉटेल मालकावर का कारवाई केली जात नाही? इतकी वर्षे त्याच्याकडे का दुर्लक्ष अधिकाऱ्यांकडून केले जात आहे? हा संशोधनाचा विषयी असल्याचे रणजीत कसबे यांनी सांगितले आहे.