Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकेल? सर्वे काय सांगतोय पहा

Lok Sabha 2024 Survey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून महाराष्ट्र्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णरीत्या बदलले असून नव्या राजकी समीकरणानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे कोण किती जागा जिंकेल? जनता कोणाच्या बाजूने कौल देईल यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याच दरम्यान, आता लोकसभेसाठी टाइम्स नाऊ नवभारतचा सर्वे समोर आला आहे. यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आपण जाणून घेऊयात….

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेनुसार, जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक पार (Lok Sabha 2024) पडली तर यामध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला तब्बल 39 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीला अवघ्या ९ जागांवर यश मिळू शकते. तर इतर कोणीही एकही जागा जिंकण्याची शक्यता नाही असं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात महायुतीची गाडी सुसाट आहे असच म्हणावं लागेल.

2019 च्या निवडणुकीत कोणाला किती जागा होत्या –

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून राज्यात 41 जागा जिंकल्या. त्यावेळी भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होती. तेव्हा 25 जागांवर लढत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तसेच शिवसेनेने 23 जागांवर लढून 18 जागा जिंकल्या होत्या. 2019 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता. याशिवाय AIMIM आणि अपक्षने प्रत्येकी १ जागा जिंकली होती.

देशात मोदींचाच करिष्मा राहील – Lok Sabha 2024

टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेनुसार, देशात पुन्हा एकदा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळणार आहे. या सर्वेनुसार भाजपप्रणीत एनडीएला 366 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विरोधकांच्या इंडिया आघाडीला 104 जागा आणि इतरांना 73 जागा मिळणार आहे. भाजपची पुन्हा एकदा देशात एकहाती सत्ता येण्याची चिन्हे आहेत.