हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दिल्ली हिंसाचारासंबंधी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. या दरम्यान आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या गैरहजेरीत पीठासीन सभापती मीनाक्षी लेखी यांनी काँग्रेसच्या ७ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित सत्रापर्यंत निलंबित केले. सभागृहात गोंधळ घातल्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबीत करण्यात आलेल्या या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह औजला यांचा समावेश आहे.
#UPDATE Seven Congress MPs- Gaurav Gogoi, TN Prathapan, Dean Kuriakose, R Unnithan, Manickam Tagore, Benny Behnan and Gurjeet Singh Aujla have been suspended from Lok Sabha for the rest of the budget session on charges of gross misconduct https://t.co/XCAI1qpBuB
— ANI (@ANI) March 5, 2020
या सर्व खासदारांना लोकसभेत चुकीचे आचरण केल्याच्या कारणावरून अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी निलंबित केले. आज (गुरुवारी) लोकसभेत सलग चौथ्या दिवशी विरोधी पक्षांनी दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी गोंधळ केला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीतील हिंसाचाराच्या चर्चेवरून काँग्रेस नेत्यांकडून पुन्हा गदारोळ सुरू करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे पीठासीन सभापती मीनाक्षी लेखी यांनी कामकाज तहकुब केले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.