पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आनंदीबाई जोशी पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते संपुर्ण टीमचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, प्रविण यादव, मनिषा कुरणे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्ड्रयुज, डॉ. स्वाती के, वाहन चालक सरदार पाटील, आरोग्य सहाय्यिका श्रीमती. सुहासिनी चोपडे आदींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment