Lok Sabha Elections 2024 | राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी आणले ‘हे’ पाच हमीभाव, ‘कृषी कर्जमाफी आयोग’ देखील करणार स्थापित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Elections 2024 | आपल्या भारतात लवकरच लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाही. तरीदेखील सगळ्या पक्षातील राजकीय नेते हे सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन घोषणा करत आहेत. लोकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देऊन त्यांचे मत कसे मिळवता येईल, याच प्रयत्नांमध्ये सध्या सगळे राजकीय नेते दिसत आहेत. अशातच महिला आणि तरुणांसाठी काँग्रेस पक्षाने काही योजना जाहीर केल्या आहेत. यानंतर आता शेतकऱ्यांसाठी देखील काँग्रेसने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता काँग्रेसने शेतकऱ्यांना पाच हमीभाव जाहीर केलेले आहेत. राहुल गांधींनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिलेली आहे. ही पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, काँग्रेस तुमच्यासाठी अशा पाच हमी घेऊन आलेले आहेत जे तुमच्या सर्व समस्या दूर करणार आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी | Lok Sabha Elections 2024

या हमींची घोषणा करत राहुल गांधींनी लिहिली आहे की, “स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार कायदेशीर दर्जा देण्याची हमी. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आणि कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी कृषी कर्ज माफी आयोग निर्मिती करण्याची हमी. विमा योजना बदलून एक नुकसान झाल्या 30 दिवसांच्या आत थेट बँकेत पैसे भरण्याचे हमी. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून नवीन आयात नियत करण्याचे धोरण बनवण्याची हमी.”

त्याचप्रमाणे राहुल गांधींनी पुढे लिहिले आहे की, “शेतकऱ्यांवरील जीएसटी काढून त्यांना जीएसटी मुक्त करण्याची हमी. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की, आपल्या संपूर्ण देशाला जो अन्न पुरवतो त्या शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी काँग्रेसचा हा मुख्य उद्देश आहे. त्यांनी हे पाच ऐतिहासिक निर्णय जाहीर केलेली आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांनी नवीन पावले टाकण्यात देखील सुरुवात केलेली आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी महिलांना पाच हमीपत्र दिली होती. यामध्ये महालक्ष्मी, उधारी पुरा हक्क, सत्तेचा आदर, अधिकार मैत्री, सावित्रीबाई फुले वस्तीगृह या योजनांचा समावेश होता. (Lok Sabha Elections 2024)

महालक्ष्मी येथील सर्वात गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी 1 लाख रुपयांची हमी, लोकसंख्येच्या निम्मी, केंद्र सरकारमधील सर्व नवीन भरतींपैकी निम्मी जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा पूर्ण अधिकार. शक्तीच्या सन्मानार्थ आशा, अंगणवाडी आणि माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या महिलांच्या पगारात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट करण्याची हमी. अधिकार मैत्री सर्व पंचायतींमध्ये एक अधिकारी मैत्रीची नियुक्ती करण्याची हमी देते, जो महिलांना जागरूक करेल आणि त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यास मदत करेल.

सावित्रीबाई फुले वसतिगृहांतर्गत देशातील नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट करण्याची आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतिगृह सुनिश्चित करण्याची हमी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.