राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल; INDIA आघाडीला मिळालं नवं बळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्य न्यायालायने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शिक्षा रद्द केल्यानंतर आज त्यांची खासदारकी पुन्हा एकदा त्यांना बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील खासदारकी बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत. यामुळे तब्बल १३४ दिवसानंतर राहुल गांधी खासदार म्हणून पुनरागमन करतील. मार्च २०२३ मध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती तसेच त्यांचं राहते घर सुद्धा त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होते. परंतु आता सर्वोच्य न्यायालयानेच त्यांच्यावरील शिक्षा रद्द केल्यानंतर राहुल गांधी याना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार म्हणून राहुल गांधी आज संसदेत जातील, त्यामुळे काँग्रेस आणि देशभरातील INDIA आघाडीला मोठं बळ मिळणार आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आजच राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.


राहुल गांधी याना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल, श्री राहुलगांधी यांना खासदारकी बहाल करणं स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे भारतातील लोकांना आणि विशेषतः वायनाडला दिलासा मिळाला आहे.आपल्या कार्यकाळात जो काही वेळ शिल्लक आहे, तो भाजप आणि मोदी सरकारने विरोधी नेत्यांना टार्गेट करून लोकशाहीला बदनाम करण्यापेक्षा प्रत्यक्ष कारभारावर लक्ष केंद्रित करून उपयोगात आणला पाहिजे.