हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये घुसखोरी प्रकरण घडल्यापासून खासदारांनी सरकारी सुरक्षा यंत्रणेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी आज 33 विरोधक खासदार लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी हे 33 खासदार निलंबित असणार आहेत. यापूर्वी याच मुद्द्याला घेऊन लोकसभेत गोंधळ घातल्यामुळे 13 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा 33 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे टी आर बालू आणि दयानिधी मरन आणि टीमसीच्या सौगाता रॉय यांचा देखील समावेश आहे. या सर्व खासदारांना लोकसभेचे कामकाज सुरू असताना गोंधळ घातल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभेचे तेरा आणि राज्यसभेच्या एका खासदाराला अध्यक्ष महोदयांकडून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आता यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या 47 झाली आहे.
दरम्यान, संसदेतील घुसखोरी प्रकरणावेळी सुरक्षा संबंधित झालेल्या चुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन सादर करावे अशी मागणी विरोधक खासदारांकडून करण्यात आली होती. याचं मुद्याला घेऊन विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी पुन्हा एकदा 33 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.