लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून 200 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2020-21 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीचीच्या हप्त्यापोटी आत्तापर्यंत प्रतिटन 2 हजार 330 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर यापुर्वीच वर्ग केली असून प्रतिटन 200 रुपये प्रमाणे होणारा एफआरपीपोटीचा हप्ता मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे कीदौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2020-21 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटी आत्तापर्यंत प्रतिटन रुपये 2330 नुसार होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनामध्ये मोठी काटकसर करण्याचे धोरण राबविले असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकयांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून एफआरपीचा हप्ता देण्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई व कारखाना संचालक मंडळाने सन 2020-21 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीपोटीचा हप्ता प्रतिटन 200 रुपये इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने आज मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी ऊस उत्पादक शेतकयांच्या बँक खाती वर्ग केली आहे.

Leave a Comment