रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद ( आंध्र प्रदेश ) |विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या माथी जनतेने पराभव मारला असल्याचे चित्र सध्या आंध्र प्रदेशात पाहण्यास मिळते आहे. कारण विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांना जनतेने विधान सभेतून घरचा रस्ता दाखवला आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका सोबत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. तर जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला लोकांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपची साथ सोडल्याने त्यांची हि वाताहत झाली असा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला विधानसभेच्या १४२ जागांवर आघाडी मिळाली असून २५ जागी चंद्राबाबू नायडू यांना अवघ्या २५ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. अशा धक्कादायक निकालामुळे पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना आता मुख्यमंत्री पद देखील गमवावे लागणार आहे.