औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच आज शनिवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले. काल शुक्रवारी दिवसभर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील काही पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. मात्र जास्त गर्दी होत असल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकजण दुसऱ्या दिवशीही पेट्रोल न भरताच माघारी परतले.
जिल्ह्यात आधीच कोरोनाचा आकडा ७५ हजारांवर गेला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी शहरात शनिवारी, रविवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच प्रतिदिन वाढत असलेला कोरोनाचा आकडा देखील धक्कादायक समोर येत आहे. यामुळे आता पेट्रोल पंप रात्री ८ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत. असे असताना दुसरीकडे आता लॉकडाऊन होणार की काय? असा देखील प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अनेक पेट्रोलपंपांवर काल रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल भरण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु लांबच लांब रांगेत उभे राहूनही अनेकांना पेट्रोल मिळाले नाही. त्यामुळे आज सकाळी अनेकांनी पुन्हा पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. परंतु त्यातही अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच पेट्रोल दिले जात असल्याने अनेकांना पेट्रोल न भरताच परतण्याची वेळ आली.
एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे पेट्रोलसाठी रांगा
एकीकडे आज विकेंड लॉकडाऊन दुसरीकडे अनेकांना काल पेट्रोल मिळाले नसल्याने आज पुन्हा पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावण्याची वेळ आली. अनेकांनी पेट्रोल आता मिळणार की नाही? या भीतीने पेट्रोल भरले. तर काहीजण कामानिमित्त बाहेर पडले. मात्र त्यांनाही पेट्रोल मिळाले नाही. अनेकांना पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासून खूप फिरावे लागले. परंतु गर्दी होत असल्याने पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा