हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मधल्या 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर पुन्हा एका बॉलीवूडने आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आणि 2022 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित सुद्धा झाले. मात्र यावर्षी अनेक चित्रपट हे कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकले. आमिर खान, करीना कपूर आणि अक्षय कुमार सारख्या स्टार्सना बायकॉट ट्ट्रेंडचा फटका सहन करावा लागला आणि त्यांचे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आज आपण जाणून घेऊया 2022 मध्ये कोणकोणते चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि यामागील नेमकं कारण काय होते.
‘द कश्मीर फाइल्स’-
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा 2022 या वर्षातील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची कथा 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. या वर्षी 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुरुवातीपासूनचा हा चित्रपट वादात सापडला . या चित्रपटावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुद्धा झालेलं आपण बघितलं होते. या चित्रपटावरुन लोक दोन गटात विभागलेली दिसले. त्यातच इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला ‘अश्लील प्रचार’ म्हणल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र नंतर त्यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती.
लाल सिंग चड्डा-
बॉलीवूड स्टार आमिर खान याचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट अनेक दिवसानंतर अखेर यावर्षी 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि बायकॉट ट्ट्रेंडचा सामना करावा लागला. प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी या चित्रपटावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला. तसेच या चित्रपटातील अभिनेत्री करीन कपूर हिने यापूर्वी ज्यांना आमचे चित्रपट पहायचे आहेत त्यांनी बघा… ज्यांना पाहायचा नाही त्यांनी पाहू नका असं विधान केलं होत , त्यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकला असेही म्हंटल जातंय.
आदिपुरुष-
प्रभास आणि सैफ अली खान यांचा मुख्य रोल असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट याचा टीझर रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटातील प्रभास आणि सैफच्या आधुनिक लूकवरून प्रेक्षक भडकले आणि त्यांनी जोरदार ट्रोलिंग सुरु केले. चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता निर्माते त्यात आवश्यक बदल करत आहेत. त्यामुळे ओम राऊतचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.
सम्राट पृथ्वीराज-
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी प्रोडक्शन कंपनी यशराज बॅनरखाली बनलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमारने सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका साकारली होती, मात्र अक्षय त्याच्या लूक आणि अभिनयामुळे ट्रोल झाला. चित्रपटात पृथ्वीराजच्या जातीवरून बराच वाद झाला होता. याशिवाय या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करणी सेनेने केला. वाढत्या वादामुळे हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी करणी सेनेलाही दाखवण्यात आला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चित्रपटाचे नाव पृथ्वीराजवरून बदलून सम्राट पृथ्वीराज असे करण्यात आले.