औरंगाबाद : सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक कार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आता त्याच वेळी दोघानी ‘जितके पैसे आहेत ते दे, नाहीतर मुर्दा पाडीन’, अशी धमकी त्यांनी कारचालकास दिली. व दगडफेक केली यात कारचालक गंभीर जखमी झाल्यानंतर डाव साधून भामट्यांनी कारचालकच्या खिशातील पैसे काढून घेतले. ही घटना शहरातील वर्दळीच्या परिसरात आलेल्या गजानन महाराज मंदिरा जवळ एक्ससार पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लूटमार करणाऱ्या एकास पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार प्रसार झाला. विनोद गायकवाड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी शहरातील वसंत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते होम प्रॉडक्ट मार्केटिंगचे काम करतात. सोमवारी सकाळी दहा वाजता चव्हाण यांचे सहकारी गणेश शिंदे, विष्णू जगताप, योगेश देशपांडे, चालक रोहन काथार आणि एक महिला सहकारी असे पाच जण मार्केटिंग चे साहित्य कारणे (एमएच 41 सी 9350) ने घेऊन कन्नडला गेले होते. सायंकाळी सहा वाजे दरम्यान शहरात परतल्यानंतर चव्हाण यांनी कार गजानन मंदिराजवळील एक्ससार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी लावली. यावेळी दोन मद्यपी तरुणांनी त्या ठिकाणी दगडफेक केली यामुळे पेट्रोल भरायला आलेले नागरिकही भयभीत झाले.
त्यानंतर घटनास्थळी पुंडलिक नगर ठाण्याचे एपीआय घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने धाव घेत एका तरुणास ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित पळून गेला. याप्रकरणी दोघांविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.