‘ या ‘ कारणामुळे प्रेमी युगुलाने केली आत्महत्या

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख 

लखमापुर येथील डाळिंब संशोधन केंद्रा जवळील कारगील वस्ती वरील प्रेमी युगलाने निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील शेतकरी नकुल भामरे हे सकाळी ६वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी  गेले असता एकांतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेले दोन मृतदेह आढळले त्यांनी पोलीसांना लागलीच खबर दिली.
लखमापुर येथील डाळींब संशोधन केंद्रालगत कारगील वस्ती म्हणुन आदिवासी समाजाची  वस्ती आहे.येथील आत्माराम दत्तु दळवी वय २२ सुनिता भुरसिंग गांगुर्डे वय १९ यांनी दिनांक ८ एप्रिलला पहाटे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्माराम याचे ४ थी पर्यंत शिक्षण झाले असुन सुनिता ही एफ.वाय.बीए.चे शिक्षण घेत होती एकाच समाजाचे व शेजारी शेजारी राहणारे आत्माराम व सुनिता यांचे दोघांचे प्रेम संबंध होते.

दोघांच्या शैक्षणिक तफावतीमुळे दोघांच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता आत्महत्येच्यापूर्वी  दिवशी सुनिता हिच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या मांडव व हळदीच्या कार्यक्रम होता. त्यामुळे वस्ती वरील सर्व लोक एकत्र जमले होते.रात्री १२ वाजेपर्यंत सर्व वऱ्हाडी एकत्र नाचले व नंतर सर्व मंडळी घरोघरी झोपण्यासाठी गेली. त्यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास दोघाही प्रेमी युगलाने एकत्र येऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. दोघांनीही आत्महत्या करण्या पूर्वी  चिठ्या लिहून ठेवल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.आमच्या मृत्युस कुणालाही जबाबदार धरू नका असे चिठ्ठित लिहिलेले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी भेट दिली.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार हेमंत कदम हे करीत आहेत.