देशातील ‘या’ राज्यात लव्ह जिहाद विधेयक आवाजी मतदानाने मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश| उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी सरकारचे महत्त्वाचे विधेयक म्हणजे, ‘लव जिहाद विधेयक ‘ आवाजी बहुमताने मंजूर केले आहे. आता हे विधेयक विधान परिषदेमध्ये पास झाल्यानंतर, राज्यपालांच्या हस्ताक्षरासाठी पाठवले जाईल. हस्ताक्षर झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर होईल.

योगी सरकारने धर्मपरिवर्तन आणि आंतर धर्मीय विवाहसारख्या घटनांवर रोख लावण्यासाठी अशाप्रकारचा मसुदा तयार केला होता. या विधेयकानुसार जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांवर वेगवेगळ्या श्रेणीमध्ये, एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतची शिक्षा देण्याचा प्रस्ताव आहे. या सोबतच पाच लाखापर्यंत दंडही पीडित पक्षाला देण्याचा देण्याचा कायदा असणार आहे.

उत्तर प्रदेशातील कॅबिनेटने 24 नोव्हेंबरच्या एका बैठकीमध्ये अध्यादेशाला मंजुरी दिली होती. जबरदस्तीने धर्मांतर समाप्त करण्यासाठी अशाप्रकारचा मार्ग काढणारे यूपी हे एकमात्र राज्य नसून, जानेवारीमध्ये मध्य प्रदेश सरकारनेही धर्म स्वतंत्रता अध्यादेश 2020 मंजूर केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment