Low Blood Pressure | लोकांची जीवनशैली आजकाल मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यांचे शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत. आणि त्या शारीरिक कष्टाची जागा आता यंत्रांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बैठी जीवनशैली, जास्त स्क्रीन टाईम यामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. यातील अनेक लोकांना रक्तदाब्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. यात हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर दोन प्रकार पडतात. रक्तदाब वाढणे जितके हानिकारक आहे. तितकेच तो कमी होणे देखील अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होतो. आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर लो ब्लड (Low Blood Pressure) प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमचे मोठे शारीरिक नुकसान होऊ शकते.
आपल्या धमन्यांमधून ज्या दाबाने रक्त वाहते. त्याला रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा दिवसभर सारखा नसतो. तो कमी जास्त होत असतो. व्यायाम करताना, झोपताना, खेळताना आपल्या शारीरिक हालचालीनुसार आपला रक्तदाब हा कमी जास्त होत असतो. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली आणि आहारामुळे देखील रक्तदाबामुळे बदल होतो. रक्तदाब वाढला तर अनेकांना त्रास होतो. परंतु तोच रक्तदाब जर कमी झाला, तरी देखील अनेक समस्या उद्भवतात. यावर जर तुम्ही नियंत्रण नाही ठेवले, तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.
कमी रक्तदाब म्हणजे काय ? | Low Blood Pressure
कमी रक्तदाबाला हायपोटेन्शन असे देखील म्हणतात. जेव्हा रक्तदाब 90 /60 मिलिमीटर जी खाली येतो. तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. याला अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली कोणत्याही प्रकारचे आजार औषध उपचारांचे दुष्परिणाम. रक्तदाब कमी झाला, तर आपल्याला चक्कर येणे यांसारख्या घटना दिसतात. तुम्ही अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
आहारात मिठाचा वापर वाढवावा
जास्त मीठ खाणे हे आरोग्यासाठी हाणीकारक असते. परंतु ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे रक्तदाब नॉर्मल राहतो. परंतु हे मीठ जास्त प्रमाणात घेताना, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील गरजेचे असते.
संतुलित आहार
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार संतुलित घेणे देखील गरजेचे आहे. आपल्या शरीराला जीवनसत्वे, खनिजे, फायबर, प्रथिने यासारख्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे आहारात या घटकांचा समावेश करा. त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहील.
अचानक उठू नका
तुम्ही जर अचानक उठला तर रक्तदाब काही सेकंदासाठी कमी होतो. आणि तुम्हाला चक्कर येते आणि तुमची स्थिती अचानक बदलू शकते. त्यामुळे उठताना अचानक उठू नका.
दररोज व्यायाम करा | Low Blood Pressure
रक्तदान नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे, खूप गरजेचे असते. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग करणे, योगा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.
भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता असेल, तरी देखील तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या. म्हणजे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहील.