LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडर आत्ताच भरून ठेवा रे!! 16 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

LPG Gas Cylinder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder । इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धाचा फटका भारतालाही बसण्याची चिन्हे आहेत. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात. मात्र अमेरिकेने इराण वर हल्ला केळ्यानंतर आता इराणने होर्मुझची समुद्रमार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे. खरं तर याचा समुद्रमार्गाने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा भारतात केला जातो. त्यामुळे जर हा पुरवठाच बंद झाला तर मग भारताला मोठा अडचणींना सामोरं जावं लागेल. मीडिया रिपोर्ट्स नुसार, देशात सध्या १६ दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे गृहिणीनो. आत्ताच गॅस सिलेंडर भरून ठेवा अन्यथा किमती वाढू शकतात.

95% LPG आखाती देशातून– LPG Gas Cylinder

इराणच्या तीन मुख्य आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीती आणखी वाढली आहे. आयात टर्मिनल्स, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण (LPG Gas Cylinder) क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त 16 दिवसांसाठी पुरेशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात एलपीजी साठवणूक करू शकत नाही. कारण साठवणुकीच्या मर्यादित सुविधा आहेत. त्यामुळे एलपीजी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास देशात मोठे संकट निर्माण होऊ शकते. भारतातील एकूण एलपीजीपैकी सुमारे 66% परदेशातून येतो आणि महत्वाची बाब म्हणजे यातील सुमारे 95% सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कतार सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून येतो. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढतो तेव्हा एलपीजी सर्वात जास्त असुरक्षित असते.

पेट्रोल- डिझेलची चिंता नाही –

एकीकडे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबद्दल साशंकता असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलबाबत मात्र कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कारण भारत हा पेट्रोलची आयातही करतो आणि निर्यातही करतो. आपण उत्पादित केलेल्या पेट्रोलपैकी 40% आणि डिझेलपैकी 30% निर्यात केले जाते. गरज जास्तच गरज पडली तर निर्यातीचे हे प्रमाण देशांतर्गत बाजारपेठेत वळवले जाऊ शकते. त्यामुळे पेट्रोल डिझेलची कमी देशाला पडेल असं अजिबात वाटत नाही. थोड्याफार प्रमाणात किमती इकडे तिकडे होतील, परंतु चिंतेचं कारण नाही.