हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG price : जगभरातील मंदीमुळे महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वाढत्या महागाईमुळे आपल्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. सिक्योरिटी डिपॉझिट्सच्या रकमेत वाढ झाल्यामुळे आजपासून कमर्शिअल एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले आहे. या आधी देखील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती एलपीजी कनेक्शनसाठीची सिक्योरिटी डिपॉझिट्सची रक्कम वाढवली गेली होती.
हे लक्षात घ्या कि, 28 जूनपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळे आता 19 किलोच्या कमर्शिअल एलपीजी कनेक्शनसाठी ग्राहकांना 2550 रुपयांऐवजी 3600 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच सिक्योरिटी डिपॉझिट्समध्ये 1050 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.LPG price
47 किलो गॅस कनेक्शनच्या सिक्योरिटी डिपॉझिट्सची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. यानंतर आता त्यासाठी 7350 रुपये मोजावे लागतील. याआधी त्याची किंमत 6450 रुपये होती. त्याच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, 14.2 किलो गॅस कनेक्शनसाठी 1450 रुपयांऐवजी 2200 रुपये सिक्योरिटी डिपॉझिट्स म्हणून भरावे लागतील. यामध्ये 750 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता 5 किलो गॅस कनेक्शनसाठी 1150 रुपये मोजावे लागतील.LPG price
हे लक्षात घ्या कि, याबरोबरच रेग्युलेटरच्या किंमतीही वाढवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता 150 रुपयांना एक रेग्युलेटर आता 250 रुपयांना मिळेल. तसेच आता रेग्युलेटर तुटल्यास किंवा खराब झाल्यास तो बदलण्यासाठी 300 रुपये मोजावे लागतील. एका बातमीनुसार, गॅस कनेक्शनच्या सिक्योरिटी डिपॉझिटमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे.LPG price
16 जून रोजी घरगुती एलपीजीचे नवीन एलपीजी कनेक्शन देखील महागले. कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची सिक्योरिटी डिपॉझिट 750 रुपयांनी वाढवली होती. म्हणजेच आता नवीन घरगुती गॅस कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला 2,200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर आधी ही रक्कम 1450 रुपये होती. आता पाच किलोच्या सिलेंडरसाठी 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. सिलेंडरसह पुरवल्या जाणाऱ्या गॅस रेग्युलेटरची किंमतही 100 रुपयांनी वाढवली गेली आहे. ज्यामुळे आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही दुसरे गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर जास्त रक्कम भरावी लागणार आहे.LPG price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ, नवीन दर तपासा
Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!
Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD, असा असेल व्याज दर !!!
Bank Holidays : जुलैमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा